Posts

Showing posts from October, 2022

मैत्री

 आज जीवनात प्रत्येकाला मोठ व्हायचं आहे. प्रत्येकाची काहीतरी स्वप्न आहेत व त्या स्वप्नपूर्ती साठी आपण अथांग मेहनत घेतो व आपण आपल्या यशाच्या शिखरावर जाऊन पोहचतो पण तिथे जेव्हा आपण पोहोचतो तिथे  आपले दूर दूर पर्यन्त कोणी नसतात.आपल्या नावाने हाक मारणार ही कोणी सोबत नसत तेव्हा मात्र आपण अतिशय तृप्त असतो स्वताचे नाव ऐकण्यासाठी व त्यावेळी आपला मित्र भेटला आणि आपलया भाषेत हाक मारली न तेव्हा आपले मन खूप आंनंदुण जाते व त्याक्षणी जो आनंद आपणास भेटतो न तो स्वप्न पूर्ती झाल्या नंतर च्या पेक्षा ही अतिशय आनंदाचा असतो.त्यामुळे जीवनात यशाचे शिखर जितके महत्वाचे तितकेच आपल्या साठी मित्र ही महत्वाचे असतात.              मैत्री हा शब्द आहे दोन अक्षराचाच पण खूप मोठ्या अर्थाचा.या शब्दात एक जिवा-भावाचे नाते जुळले आहे.हे नाते आपण स्वता सहवासातून बनवत असतो कारण मानव हा समाज शील प्राणी आहे. त्यामुळे जर त्याला जीवन सुंदर पद्धतीने जगायचे असेल तर त्यास कोणी तरी आपल्या जिवा भावाचा व्यक्तिमत्व असलेला जोडीदार हवा असतो.त्यास्तव अगदी लहान पासूनच आपण मित्र बनवत असतो.मित्र बनवत अ...

महिला दिन बद्दल दोन शब्द ........

   ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या कृतीने क्लारा झेटकिन ही कम्युनिस्ट कार्यकर्ती प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लाराने मांडला. तो पास झाला.त्या अनुषंगाने  भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस (८ मार्च) १९४३ साली साजरा झाला. १९७५ हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले, ...

वृद्धाश्रम

 आई वडील म्हणजे मला भूक लागली पासून,तुम्हाला स्वता करून खाता येत नाही का पर्यंतचा प्रवास..            आई वडील म्हणजे तुम्ही माझ्या मनात राहता पासून,तुम्हाला वृद्धाश्रमात राहावे लागेल पर्यंतचा प्रवास.. अशी परिभाषा आधुनिक समाजाची बनत आहे..               वृद्धाश्रमाचे नाव ऐकताच नवीन तरुणाईला प्रश्न पडतो जर वृद्धश्रम ही वाईट बाब तर याची निर्मितीच का झाली असेल?              म्हणतात म्हातारपण हे दुसरे बालपण असत,पण खरच या बालपणाला दुसरी आई कुठून आणायची ? हा प्रश्न आजच्या आधुनिक तरुण वर्गाला पडतो व उत्तर म्हणून ते वृद्धाश्रम......आहेच.          ज्याप्रमाणे अनाथ आश्रम निर्माण करण्यामागे खरेतर खूप लोकांनी विचार केला असेल. अशी मूल जी एकाकी जीवन जगतात,ज्या मुलांचे आईवडील अपघातात मरतात आणि त्यांचे नातेवाईक एका अवाजवी ओझप्रमाणे त्यांना पाहत असतात,अशा माता ज्यांना मूल नको म्हणून कचर्‍याच्या ढिगावर नवजात बाळांना सोडतात, हम दो हमरे दो च्या काळात पहिली मुलगी असताना दुसरी ...

रिवर्स मायग्रेशन

  “हम मेहनतकश जगवालों से जब अपना हिस्सा मांगेंगे। इक खेत नहीं, इक देश नहीं, हम सारी दुनिया मांगेंगे।।” फैज़ अहमद फैज़  यांनी आपल्या साहित्यातील ओळ्यांमधून मजदूर वर्गास सन्मान मिळवून देण्याचा त्यासोबतच त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे.खरे पाहता प्रतेक राजकीय पक्ष हा मजदूर वर्गाचे हक्क लढण्याच्या हेतूनेच स्थापन झालेला आपणास पाहावयास मिळतो.प्रत्येक पक्षाच्या घोषणा पत्रामध्ये मजदूर व तळा गाळातील लोकांच्या हितासाठी कार्य करणे हाच अजेंडा असतो.पण जेव्हा खर्‍या अर्थाने जमिनी स्तरावर मजदूर किंवा त्या लोकांसाठी काम करण्याची वेळ येते तेव्हा मात्र सर्व जन आपले हात वर करतात.असच काही भारतात कोरोंना (कोविड-19) विषाणू संदर्भात देशव्यापी लोकडाउन परिस्थितीत मजदूर यांच्या परिस्थिति विषयी झालेले आपणास दिसून येते.म्हणजेच मजुरांना मोठ्या प्रमाणात स्थलांतर याच्याशी दोन हात करावे लागत आहेत.व लॉक डाउन दरम्यान होणारे स्थलांतर हे प्रामुख्याने सामान्य परिस्थितील स्थलांतर पेक्षा पूर्णता उलट आहे.रोजगार,दर्जेदार जीवन या अशा कारणांमुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे मजुरांचे मोठ्या प्रमाणात ...

स्त्रीत्व

  आज वाचत असताना संदर्भ आला की  बांझ क्या जाने प्रसव पीडा   वाचल्यानंतर मला  ही त्यात काही मोठी बाब वाटली नाही पण थोड मंथन केल्यानंतर मला आठवलं की समाजात एखाद्या स्त्री ल स्त्रीत्व हे अपत्य प्राप्ती नंतर प्राप्त होते व जर का काही कारणास्तव स्त्री ला अपत्य प्राप्ती झाली नाही तर समाजात तिला पुरता मान नसतो,तिला अशुभ मानण्यात येत व एखाद्या शुभ कार्यक्रम मध्ये सहभागी करून घेत नाहीत याचे ऊत्तम उदाहरण - अलीकडे प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा "लय भारी" त्या मध्ये चित्रपटच्या सुरुवातीलाच याबाबत चा संदर्भ आलेला आपणास पाहावयास मिळतो, पण हे खरोखरच योग्य आहे का?        प्रत्येक स्त्री ला  संतती प्राप्ती बद्दल ची ईच्छा असते. आपल्या पाल्याचे पालन पोषण करणे.तसेच त्याला जगातील प्रतेक सुख देऊन अतिशय आनंदात त्यास वाढवावे या सर्व साखर स्वप्ना मध्ये स्त्री गर्भधारणा व प्रसूती वेळी प्रसूती वेदना सहन करते.यामुळेच प्रसूती वेदना ही एक स्त्री साठी अतिशय गौरवाची गोष्ट असते.पण नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणा मुळे संतती प्राप्ती होत नसेल तर साहजिकच ती स्त्री मानसिक त्र...

स्क्रीन आणि नैराश्य....

 अलीकडेच अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केली व आठवडा भर मित्र-परिवार यांचे काळजी वाहू फोन चालू झाले. त्यामुळे डिप्रेशन स्ट्रैस यासारख्या गोष्टींवर चर्चा जोरात चालू झाली. त्यापैकीच मी ही त्यासंबंधी थोड लिहू इच्छितो...... खरे पाहता सुदैवाने माझा मित्र परिवार चांगला कारण ज्याक्षणी मला नैराश्य वाटू लागलं तेव्हा अगोदर मी कॉल करून बोललो.व त्यांनीही माझ्या परिस्थिति वर न हसता बोलून साथ दिला.त्यामुळे त्याव्यक्ति च सर्व प्रथम धन्यवाद.                 आजचे युग तंत्रज्ञान चे युग म्हणून ओळखले जाते व मानव हा समाज शील प्राणी आहे हे सर्वांना माहीतच आहे त्यामुळे थोड बोर वाटत असेल पण यावर आपण कधी विचार नाही केला. या युगात reality ची जागा ही स्क्रीन ने घेतली आहे.त्यामुळे मैदानी खेळ,मित्र,कार्यालये,काम हे सर्व एका स्क्रीन च्या माध्यमात गेले. त्यामुळे लोकांचा सहवास कमी झाला व स्क्रीन वर दिसणारे आभासी जग हे आपणा सर्वांचे जग,दुनिया झाली. मग आता त्या आभासी दुनियेत आपण किती भारी आहोत हे सर्वांना दाखवण्यासाठी आपली स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत विजेता कोण...

कौमार्य / Virginity

  पुरुष प्रेम देतो शरीरासाठी स्त्री शरीर देते प्रेमासाठी             या वाक्यतून पुरुष-प्रधान संस्कृती ल नक्कीच ठेच लागली असेल. पण करणार काय,आज वास्तव हेच आहे.... आपली संस्कृती बदलत आहे. पेहराव,राहणीमान,दृष्टीकोण बदलत आहेत.हे स्वागतार्ह आहे....पण याच सोबत आपले विचार,आचार,रूढी,परंपरा बदलत नाहीत याची खंत आहे.... त्यापैकीच एक कौमार्य / verginity ही एक आहे.ज्यामुळे एका स्त्री ला मानसिक त्रासास सामोरे जावे लागते.कौमार्य विषयी ग्रामीण व शहरी भागात विविध संकटांना मुलींना सामोरे जावे लागते.....                आपल्या पैकी बर्‍याच जणांना कौमार्य हा शब्द माहीत नसला तरी verginity हा शब्द नक्कीच माहिती आहे कारण एखाद्या मुली संदर्भात मुलांमध्ये विषय निघल्यास जास्त याचीच चर्चा होते व आपल्या सर्वांचा आवडता curious असलेला हा विषय आहे. त्यामुळे नक्कीच याविषयी सर्वांना माहिती आहे. तरी कौमार्य म्हणजे - एखाद्या व्यक्तीने यापूर्वी कधीच शारीरिक संभोग केलेला नाही असा होतो. हा छोटासा शब्द स्त्रीयांचे चरित्र ठरवत असतो.जर कौमार्य शाश्...

स्त्री सौंदर्य कि बंधने ?

 अलीकडेच  वाचनात आलेलं कि तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही आपल्या प्रेदेशातील रस्ते हे अगदी महिलेच्या गाला प्रमाणे करू !!!! हे विधानैकताच कुठेतरी मनात तिरस्कार भरून आला. या पितृसत्त मानसिकते विरुद्ध त्यानिम्मिताने ....                          पितृसत्ता म्हणजे स्त्रियांच्या अधिकारांचे हनन करून पुरुषी सत्ता समाजात गाजवणे हे आपणास व्याख्येरूपी सांगता येत. याच पितृसत्ता चा मान सदैव टिकून राहावा यासाठीच आपण स्त्रियांवर सौंदर्य रुपी बंधने घातली आहेत. ती कोणती व कशा प्रमाणे आपण पितृसत्ता टिकवून ठेवेत आहोत ते आपण पुढे थोडक्यात पाहणार आहोत.              स्त्रियांनी केस वाढवावे त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडत असते असे आपण नेहमी दूरदर्शन तसेच अन्य ठिकाणी च्या जाहिराती मधून पाहतो पण खरे पहिले असता पितृसत्ता टिकवण्य मध्ये एखाद्या स्तीयांचे केस ओढले कि तिची ताकत हातात येतेच सोबत त्यांना आपण भिरकावु शकतो म्हणजेच केस या सौंदर्य रुपी वस्तू ने स्त्रियांना पुरुषांनी हातात ठेवले आहे असे आपण म्...

समाज व समलिंगी आणि तृतीयपंथी

 छक्क,हिजडा,षंढ,जोगप्पा,ई. नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे असणार जो शरीर यष्टीने  पुरुष अथवा महिला पण स्वभावाने स्त्री अथवा पुरुष त्यासच आपण शुद्ध भाषेत तृतीयपंथी म्हणतो. तृतीयपंथी भारतीय समाजाचा अतिशय पूर्वी पासून हिस्सा आहेत पण आपल्या गलीछ् मानसिकतेचा शिकार झाल्याने त्यांना त्यांची लढाई आजही लढावी लागत आहे. त्याबाबतच आज थोडा आपण विचार करूया,.....                मी,तुम्ही खूप नशीबवान आहोत...का तर आपणास आपल्या लिंग बद्दल खात्री आहे. व विशेष म्हणजे आपल्याला विरुद्ध लिंगी शारीरिक आकर्षण आहे.ज्यामुळे आपण स्त्री,पुरुष या वर्गामध्ये काही न करता बायोलोजीकली विभागलेले आहोत. ज्यामुळे आपणास आपला साथीदार हा सहज मिळून जातो. पण काही क्रोमोसोमल अब्रेशन मुळे आपल्या समाजात तृतीयपंथी, समलिंगी व उभयलिंगी हि अस्तित्वात आहेत. त्यांना नैसर्गिक रित्या सम लिंगी किंवा बहुलिंगी आकर्षण असते.पण आपल्या समाजात अशा संबंधाना मान्यता नाही. मग त्यांना आपला साथीदार निवडीसाठी अतिशय सहन करावे लागते. जेव्हा बालवयात त्यांना आपण स्त्री - पुरुष नसून आपल्याला वेगळ आकर्षण...

ती.....,

  भारतामध्ये दर वर्षी प्रामुख्याने १२ लाख कर्करोग रुग्ण नोंद होते व ८ लाख रुग्ण मृत्यू पावतात. म्हणजे हि आकडेवारी पाहिलं असल्यास कोविद - १९ पेक्षा हि भयंकर आहे. यात पुरुष व महिलांचे प्रमाण समान असल्याचे दिसून येते. पण जेव्हा आपण पुरुष संबंधी विचार केला तर त्यांना कर्करोग होण्याचं मुख्य कारण व्यसन आहे. याबाबत प्रत्येक जन बोलत त्यामुळे मला त्याबद्दल न बोलता आपली विचार सरणी आणि महिला कर्करोग यावर थोडासा प्रकाश टाकावासा वाटतो.                घरामध्ये आई जेव्हा नाश्त्यासाठी ईडली करते,तेव्हा तिची हि खूप इच्छा असते गरम - गरम खावेत. कारण गरम इडलीच फारशी चविष्ट लागते, पण होत उलट - आई सर्वाना गरम इडली खाऊ घालते नंतर ती सर्वांचे डबे भरते यादरम्यान परिवारासाठी केलेल्या इडली उरतात व त्या थंड होतात. मग आई अन्न कशाला वातोळ करायचं म्हणून थंडच इडली खाते. तसेच आपण tv मालिका मध्ये पाहतो, जी नट असते ती सर्व परिवाराचे जेवण झाल्यानंतरच जेवण करते. मग यावरून असं दिसून येत कि आपण भौतिक रित्या आधुनिक झालेलो आहोत पण विचाराने आणखी मागास आहोत हे नक्की.    ...

शिक्षणव्यवस्था

  काल मी इस्त्री वाल्याकडे कपडे आणण्यासाठी गेलेलो. थोडा वेळ लागणार होता.त्यामुळे त्याच्या जवळील बाकावर मी बसलो. एवढ्यात त्याने प्रश्न केला, काम काय करता ? मी हसत उत्तर दिल, नाही काका... आणखी मी शिकत आहे. अच्छा, काय शिकत आहेस मग ? मी म्हटलं माझ M.A. चालू आहे. त्यावर त्याने तोंड हिरमुडत हुं, मग काही कामाचं नाही, असं माझ्या सरळ तोंडावर म्हटलं.... ते बरोबर हि होत, कारण वडिलांना मदत करण्याच्या वयात मी शिक्षण घेत आहे व ते जे सर्वाना माहिती कि यातून काही होणार नाही. पण महत्व आहे त्या पास झालेल्या कागदाला, एवढच...           आज आपल्या अभ्यासक्रमात पर्यावरण जन जागृती साठी विषय आणला आहे, पण सर्व विद्यार्थी त्याला अभ्यासक्रमाचा विषय समजून फक्त पास होण्याचा प्रयत्न करतात. त्यातून मिळणारे ज्ञान आपल्याला काहीच गरजेचे वाटत नाही. त्यामुळे प्रदूषण अभ्यास करून हि आपण बुलेट वरून फेरफटका मारतो तर प्रदूषण चा विचार न करता शेतकरी शेतात पाणी सोडून रात्र भर झोपतो.त्यामुळेच कदाचित शिक्षित व अशिक्षित आज पर्यावरण रक्षण करण्यामध्ये एकाच रेषेत आहेत.          ...