स्त्री सौंदर्य कि बंधने ?

 अलीकडेच  वाचनात आलेलं कि तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही आपल्या प्रेदेशातील रस्ते हे अगदी महिलेच्या गाला प्रमाणे करू !!!! हे विधानैकताच कुठेतरी मनात तिरस्कार भरून आला. या पितृसत्त मानसिकते विरुद्ध त्यानिम्मिताने ....

                         पितृसत्ता म्हणजे स्त्रियांच्या अधिकारांचे हनन करून पुरुषी सत्ता समाजात गाजवणे हे आपणास व्याख्येरूपी सांगता येत. याच पितृसत्ता चा मान सदैव टिकून राहावा यासाठीच आपण स्त्रियांवर सौंदर्य रुपी बंधने घातली आहेत. ती कोणती व कशा प्रमाणे आपण पितृसत्ता टिकवून ठेवेत आहोत ते आपण पुढे थोडक्यात पाहणार आहोत.

             स्त्रियांनी केस वाढवावे त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडत असते असे आपण नेहमी दूरदर्शन तसेच अन्य ठिकाणी च्या जाहिराती मधून पाहतो पण खरे पहिले असता पितृसत्ता टिकवण्य मध्ये एखाद्या स्तीयांचे केस ओढले कि तिची ताकत हातात येतेच सोबत त्यांना आपण भिरकावु शकतो म्हणजेच केस या सौंदर्य रुपी वस्तू ने स्त्रियांना पुरुषांनी हातात ठेवले आहे असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर बांगड्या - खरे पहिले तर आज शहरी मुली यांचा वापर फार कमी करतात पण नक्की ग्रामीण भागात आज हि वापर मोठ्या प्रमाणात होतो तर या बांगड्या न्वये आपण स्त्रियांची हाता मधील काम करण्याची ताकद कमी करत आहोत हे जाणवून येत कि नाही ? अगदीच हो कारण कोणतेही काम करत असताना त्यांना हातातील बांगड्या मुळे त्यांची काम करण्याची स्पीड अगदीच कमी होते. याच सोबत पायात देखील चैन आणि जोडवे - मान्य आहे हि एक धार्मिक बाब पण खरच त्यांनी काही फरक पडत नाही का ? जर तुम्ही आधुनिक नसाल तर नक्कीच हो पण जर कदाचित तुम्ही आधुनिक आहात तर तुमच्या पायांवर / चालण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॅट वाक आहेच. यावरून तुम्ही आधुनिक असा किंवा प्राचीन स्त्रियांवर बंधने घालण्यासाठी समाज नेहमी पुढेच येत आहे. यामुळे सौंदर्य याच्या नावाखाली पुरुषी समाजाने स्त्रियांचे नखे वाढवली. त्याला पोलिश केले असता तेही सौंदर्य पण खरे पहिले तर तुमचे नखे जास्त लांब असल्याने तुमच्या हातावर नियंत्रण ठेवण्यात अगदीच मदत होते.

             मध्ययुगीन जगाचा इतिहास पहिले असता गुलाम मोठ्या प्रमाणात प्रचलित होते अगदी त्याच पद्धतीने आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये आपण पितृसत्ता टिकवण्यासाठी स्त्रियांना गुलाम केलेलं आहे अगदीच त्यांच्या हात पाया मध्ये बेड्या नाहीत पण संदर्य रुपी बेड्या - केस,नातानी,झुमका,बांगड्या,नखे,जोडवे व अन्य या सर्व महिला सशक्तीकरण मध्ये आडव्या येणारे संकट आहेत. तसेच आपण पडद्यावर एखाद्या अभिनेत्री ला पहिले असता तिने कदाचितच या सर्व वस्तू परिधान केलेल्या असतात.तरी देखील त्या सौंदर्याने परिपूर्ण असतात न...पण आपण हि मान्य केल कि स्त्री सशक्तीकरण साठी याच गोष्टी बाधा टाकत आहेत पण याच सोबत आणखी म्हणजे पुरुषांची स्त्रीयान्प्रती मानसिकता...तुम्ही एखदे वेळी हॉटेल/लॉज किंवा अन्य ठिकाणी गेले असाल तर प्रमुख्याने तुम्हाला आढळून येईरीसेपानिष्ट हे पद फक्त महिलांकडे असते,म्हनाजेच मला त्या स्त्री बद्दल किंवा त्या पद बद्दल काही म्हणायचं नाही तर फक्त एवढाच कि एखादे वेळी आपण जर कोणाची वाट पाहत असू किंवा अन्य कारणानिमित्त आपण काही क्षण तिथे बसू तर त्या स्त्रीचे आपण सौंदर्य दर्शन करावे हे अगदीच चुकीचे, म्हणजे पुरुष एखद्या स्त्री चे संदर्य हे करमणुकीचे साधन म्हणून आपण सर्वांपुढे सदर करत असतो. 

               अशा प्रकारच्या अनेक मानसिकता आपल्या समाजात आहेत त्या सर्व मानसिकते वर आपण सर्वांनी मिळून विजय मिळवला पाहिजे तेव्हाच कदाचित आपण स्त्री पुरुष समानता झाली हे ठाम पाने म्हणू शकतो.

Comments