स्त्रीत्व
आज वाचत असताना संदर्भ आला की बांझ क्या जाने प्रसव पीडा वाचल्यानंतर मला
ही त्यात काही मोठी बाब वाटली नाही पण थोड मंथन केल्यानंतर मला आठवलं की समाजात एखाद्या स्त्री ल स्त्रीत्व हे अपत्य प्राप्ती नंतर प्राप्त होते व जर का काही कारणास्तव स्त्री ला अपत्य प्राप्ती झाली नाही तर समाजात तिला पुरता मान नसतो,तिला अशुभ मानण्यात येत व एखाद्या शुभ कार्यक्रम मध्ये सहभागी करून घेत नाहीत याचे ऊत्तम उदाहरण - अलीकडे प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा "लय भारी" त्या मध्ये चित्रपटच्या सुरुवातीलाच याबाबत चा संदर्भ आलेला आपणास पाहावयास मिळतो, पण हे खरोखरच योग्य आहे का?प्रत्येक स्त्री ला संतती प्राप्ती बद्दल ची ईच्छा असते. आपल्या पाल्याचे पालन पोषण करणे.तसेच त्याला जगातील प्रतेक सुख देऊन अतिशय आनंदात त्यास वाढवावे या सर्व साखर स्वप्ना मध्ये स्त्री गर्भधारणा व प्रसूती वेळी प्रसूती वेदना सहन करते.यामुळेच प्रसूती वेदना ही एक स्त्री साठी अतिशय गौरवाची गोष्ट असते.पण नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणा मुळे संतती प्राप्ती होत नसेल तर साहजिकच ती स्त्री मानसिक त्रासातून जीवन जगत असते व त्यात सामाजिक दूषणे यामुळे तर त्या स्त्री चे जीवन अतिशय खडतर होते यात शंका नाही.तेव्हा अशा वेळी त्या स्त्री ला बळ देन हे घरातील प्रतेकाच कर्तव्य आहे.पण आपल्या कडे परिस्तिथी उलटिच. एखाद्या नवीन जोडप्याच लग्न झाल असता आई वडिलांची फार इच्छा असते की नात वांची तोंड पहावीत म्हणजे मरण्यास मोकळं अस विचार करतात व जोडप्यांवर अपेक्षा चे भंडार उभारतात. खरे पाहता त्यांची इच्छा ही योग्यच आहे पण याच इछापूर्ती साठी वाटेल ते करण्यास तयार असतात. व जर का त्या स्त्री ला संतती प्राप्ती होत नसेल तर तिला घरातूनच सर्वप्रथम दूषणे देण्यास सुरुवात होते.
समाज ही सर्व प्रथम स्त्री ला दोष देण्यात पुढाकार घेतो कारण पुरुषप्रधान संस्कृती न. यास्तव समाजातील दूषणे आणि आई वडिलांची इच्छा यातून पुरुष ही अपत्य प्राप्ती का होत नाही याचे योग्य कारण न पाहता दूसरा विवाह करतो. अन नाविलाजाने त्या स्त्री ला सर्व काही सहन कराव लागत.अशा मनस्तीथी वेळी स्त्री ला निदान आपल्या जीवनसाथी चा सहयोग अपेक्षित असतो कारण लग्न समारंभात त्यांनी आयुष्यातील प्रतेक क्षणी साथ देईन याची गाठ बांधतात. पण काही दिवसातच ही परिस्तिथी उद्भवेल तर खूप वाईट आहे.
खरे पाहता समाजाचे आणि पुरुषाचे खूप काही चुकत आहे अस मला वाटत
स्त्री ला स्त्रीत्व प्राप्त करण्यासाठी माता बनणे हे अतिशय आवश्यक आहे व जर का स्त्री ला मातृत्व प्राप्त झाले तर ती शुभ पण एरवी मातृत्व आणि गर्भधारणा या मधील मासिक पाळी यास सर्व जन अशुभ मानतात. माझ्या मते सर्वांना याबद्दल कल्पना आहे , मग त्यावर योग्य चर्चा करायला,त्याबद्दल योग्य माहिती देण्यासाठी,त्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी त्यावर योग्य ती चर्चा का होत नाही? आता या विषयावर थोड लिहिताना भीती आहेच कारण समोर जरि कौतुक झाल पण हा काय विषय आहे का लिहायचा? अस माझ्या मित्रांच्या मनात येईल. कारण त्यांच्यासाठी मासिक पाळी हा विषय मजाक किंवा अपवित्र आहे. व कदाचित यामुळेच स्त्री ला अजूनही कमकुवत आणि दुय्यम वागणूक पुरुषी मानसिकते कडून दिली जाते.
मासिक पाळीला राजस्वला असही म्हणतात. या दोन्ही संकल्पना मुळात स्त्री च्या मातृत्व संबधी आहेत. म्हणजेच ज्या गोष्टीच्या आधारे स्त्री ला मातृत्व प्राप्ती होते. जेव्हा मानवाच्या रूपात परमेश्वराने अवतार धारण केले मग ते देवकीच्या पोटी श्रीकृष्ण किंवा कौसलेच्या पोटी श्रीराम असो त्यांना जन्म घेण्यासाठी आईच्या गर्भाशयाची गरज भासलीच न! मग जी स्टीथी नवनिर्माणशी, मातृत्वशी संबधित आहे ती अपवित्र कशी काय असू शकते?
आपण विज्ञान च्या सहाय्याने समजून घेतले असता स्त्री च्या शरीरामध्ये प्रत्येक महिन्याला एक आर्तव जमा होतो.याचा उपयोग गर्भधारणेसाठी होतो. नऊ महीने यावरच गर्भाचे पालन पोषण होते,पण इतर वेळी या आर्तव (रक्ताचा ) उपयोग होत नाही म्हणून ते महिन्याच्या ठराविक दिवसामध्ये बाहेर पडत. यालाच रजस्वला म्हणतात. व ही अगदी नैसर्गिक क्रिया आहे. जस पचनसंस्था, श्वासोछवास ह्या जशा आहेत अगदी तशाच. मग पाळीला अशुद्ध मानण्याचे कारण काय ? जेव्हा एखाद्या स्त्री ला बाळ होत तेव्हा कुणीच अस म्हणत नाही हे अशुद्ध रक्तपसून तयार झालेल आहे म्हणून.तेव्हा तर त्या स्त्री ची ओटी भरली जाते, मग एकाच गोष्टी साठी एकाच स्त्री ला एवढी विसंगत वागणूक का? जरी ही रूढी परंपरा असली तरी त्या परंपरा पुरातन काळात परिस्तिथी वर अवलंबून होत्या. आता काळ बदलला आहे तर विचार सारणी ही बदलली पाहिजेच.कारण काळाबरोबर गरजा ही बदलत असतात व आज विचार परिवर्तनाचीच गरज आहे.
घराला वारस किंवा मुलगा हवा या अशा परिस्थितीनं स्त्री ला बळी न ठरवता त्यावेळी तिला मानसिक बळ देणे हेच महत्वाचे आहे. आणि मात्रत्व हे जगातल सगळ्यात मोठ वरदान आहे, त्याला विटाळ बनवू नका,मासिक पाळी स्त्री ला पूर्णत्वास नेते, ती अशुद्ध असूच शकत नाही. अर्थातच हे परिवर्तन लगेच घडून येणार नाही, कारण वर्षानुवर्षे चालत आलेल्या या रूढी चा पगडाच तेवढा जास्त आहे. आणि मी सुधा त्याच समाज व्यवस्थेचा भाग आहे, पण आपण बदल घडवू शकतो.हे मला कळतय तर मी मानसिकता बदलवत आहे,......
Comments
Post a Comment