स्क्रीन आणि नैराश्य....
अलीकडेच अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केली व आठवडा भर मित्र-परिवार यांचे काळजी वाहू फोन चालू झाले. त्यामुळे डिप्रेशन स्ट्रैस यासारख्या गोष्टींवर चर्चा जोरात चालू झाली. त्यापैकीच मी ही त्यासंबंधी थोड लिहू इच्छितो...... खरे पाहता सुदैवाने माझा मित्र परिवार चांगला कारण ज्याक्षणी मला नैराश्य वाटू लागलं तेव्हा अगोदर मी कॉल करून बोललो.व त्यांनीही माझ्या परिस्थिति वर न हसता बोलून साथ दिला.त्यामुळे त्याव्यक्ति च सर्व प्रथम धन्यवाद.
आजचे युग तंत्रज्ञान चे युग म्हणून ओळखले जाते व मानव हा समाज शील प्राणी आहे हे सर्वांना माहीतच आहे त्यामुळे थोड बोर वाटत असेल पण यावर आपण कधी विचार नाही केला. या युगात reality ची जागा ही स्क्रीन ने घेतली आहे.त्यामुळे मैदानी खेळ,मित्र,कार्यालये,काम हे सर्व एका स्क्रीन च्या माध्यमात गेले. त्यामुळे लोकांचा सहवास कमी झाला व स्क्रीन वर दिसणारे आभासी जग हे आपणा सर्वांचे जग,दुनिया झाली. मग आता त्या आभासी दुनियेत आपण किती भारी आहोत हे सर्वांना दाखवण्यासाठी आपली स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत विजेता कोण हे आपण स्वतच ठरवत असतो ते ही स्क्रीन वर पाहून यामुळे डिप्रेशन स्ट्रैस यासारक्या गोष्टी आज युवा पिढी मध्ये कॉमन झालेल्या आहेत.त्यामुळे मला स्ट्रैस येत मी दुसर्यांसारखा सामान्य नाही असा काही एक नुनगंड बाळगण्याची आवश्यकता नाही.फक्त तो होऊ नये याची खबरदारी सर्वांनी नक्की घ्यायला हवी.
आज आपल्या पैकी बहुतेक जन म्हणजे त्यात मीही आलोच, त्यामुळे आपण सर्व जन व्हाट्सप्प,फेसबूक,इंस्तग्राम,ट्वीटर,स्ंनेपचॅट ई. सोशल मीडिया वर आपली जी सर्वात भारी फोटो आहे तीच पोस्ट करण्याचा प्रयत्न करतो,व आपण इंग्लिश मध्ये नापास असूनही अतिशय फ्क्लुएंत इंग्लिश मध्ये त्यात टिप्पणी टाकतो. हे करत असताना पुढच्या व्यक्ति विषयी आपल्या मनात काहीही नसतं,फक्त असतो तो म्हणजे मी किती भारी आहे हे दाखवून देण्याचा उद्देश. व यातूनच पुढे तुलना होण्यास सुरुवात होते ती पुढे नैराश्य रूप धरण करते व व्यक्ति ल अतिशय टोकाचे पाऊल घेण्यास प्रवत्त करते.बर तो पाऊल घेतल्याने काही आपली परिस्थिति सुधारणा होणार आहे का तर बिलकुल नाही....यामुळे स्क्रीन व आभासी जग हे फक्त बाहेरून दिसण्यास फार सुंदर आहेत पण आत मध्ये काहीच नाही. म्हणून म्हणतात न दिसते तसे नसते म्हणून जग फसते.
स्क्रीन अथवा आभासी जग याविषयी आपण बोलतो तेव्हा ऑनलाइन प्रेम याविषयी न बोलणे म्हणजे न्याय होणार नाही त्यामुळे याविषयी थोडसं....आज आपण फेसबूक किंवा अन्य सोशल मीडिया माध्यमातून जगातील नव-नवीन मित्रांशी संवाद साधतो,त्यापैकि विरूद्ध लिंगी कोणी असेल तर ती चर्चा नक्कीच फार रंगते. व त्यातून आपणास खूप आनंद मिळतो.वाटत आपणाला ओळखणार कोणी तरी या जगात आहे अस वाटून आपण ती चर्चा तिथेच न थांबवता फार पुढे घेऊन जातो. व पुन्हा ते आपणास त्या व्यक्तिला बोलण्याच व्यसन लागून जात व आपण नादान त्यालाच न पाहिलेलं प्रेम समजून आशिक होऊन बसतो.मात्र पुन्हा जेव्हा ती व्यक्ति कोन आहे किंवा आपल्या व्यसनी प्रेमाला नकार आला तेव्हा आपण नैराश्य च्या सागरात छिद्र पडलेली जहाज होऊन तरंगत असतो. त्यामुळे स्क्रीन म्हणजे सर्व विश्व आहे हे चुकीचे......उद्या त्या नैराश्य रूपी सागरात तुम्ही संपूर्ण डुबल तेव्हा वास्तविक विश्व हेच त्यातून बाहेर येण्यास मदत करेल,त्यामुळे जरी आभासी दुनियेतील मित्रांचे बादशाह तुम्ही असाल तरी वास्तविक जीवनात एक गंगू मित्र नक्की सोबत ठेवा,कारण आभासी जीवन आज आहे उद्या नाही तेव्हा वास्तविक जीवनातील गंगू तूम्हाला परत एकदा पायावर थांबण्यास मदत करेल.......
समजा आपल्या भारत स्वतंत्र लढा दरम्यान स्क्रीन अस्तीत्वात असती तर आपला लढा यशस्वी झाला असतं का? की आपण आजही पारतंत्र्यात असतो?
माझ्यामते नक्कीच आपण आजही पारतंत्र्यात असतो व दुसर्यांच्या आयुष्याची आपणास काहीच किमत नसती मग राष्ट्रवाद तर फार दूर......
अमेरिकन क्रांति,फ्रेंच क्रांति किंवा आपला भारतीय स्वातंत्र्य लढा हा मुख्यता मिडल क्लास लोकांनी लढवला आहे,कारण श्रीमंत लोकांना अन्याया ची झळ ही बसत नाही,गरीब वर्गाला स्वताच पोट कस भरेल याची चिंता असते त्यामुळे तो देखील अन्याय विरोधात लढा देण्यास समोर येत नाहीत. त्यामुळे जगातील मुख्य क्रांति असो आथवा आपला स्वातंत्र्य लढा त्यात मुख्य योगदान हे मिडल क्लास चे असलेले दिसून येते.19 - 20 शतकात भारतात फक्त 40 लाख एवढा वर्ग हा मिडल क्लास होता असे सांगता येत व आज पाहता त्याची संख्या वाढून 40 करोड इतकी नक्कीच झाली असेल.मग आज भारतात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते पण हातात असणार्या स्क्रीन मुळे सामान्य माणूस देखील क्रांति करण्या पासून अडवला जातो. तो त्याचे कर्तव्य एवढच समजतो की फोटो / विडियो फॉरवर्ड केला म्हणजे आपल कर्तव्य संपलं. या अशा मुळे आपण खरच स्वतंत्र न होता आणखी मागे राहिलो असतो.
शेवटी.....
आज आपण जे स्क्रीन वर पाहतो,ऐकतो किंवा त्यात सहभाग घेऊन योगदान देतो ते कितपत खरे आहे याचे फक्त त्याच व्यक्तिला माहीत असते.ज्या पद्धतीने प्रतेक व्यक्तीच्या दोन कहाणी असतात एक जी तो जगाला दाखवतो व दुसरी जी तो जगापासून लपवून ठेवतो अगदी त्याच पद्धतीने आभासी जग आणि वास्तविक जग यातील जीवन आहे.... यामुळे तुलना न करता निराश न होता वास्तविक जगायला शिका व जीवनाचा आनंद घ्या.....
- प 1 निलेवाड
Comments
Post a Comment