ती.....,
भारतामध्ये दर वर्षी प्रामुख्याने १२ लाख कर्करोग रुग्ण नोंद होते व ८ लाख रुग्ण मृत्यू पावतात. म्हणजे हि आकडेवारी पाहिलं असल्यास कोविद - १९ पेक्षा हि भयंकर आहे. यात पुरुष व महिलांचे प्रमाण समान असल्याचे दिसून येते. पण जेव्हा आपण पुरुष संबंधी विचार केला तर त्यांना कर्करोग होण्याचं मुख्य कारण व्यसन आहे. याबाबत प्रत्येक जन बोलत त्यामुळे मला त्याबद्दल न बोलता आपली विचार सरणी आणि महिला कर्करोग यावर थोडासा प्रकाश टाकावासा वाटतो.
घरामध्ये आई जेव्हा नाश्त्यासाठी ईडली करते,तेव्हा तिची हि खूप इच्छा असते गरम - गरम खावेत. कारण गरम इडलीच फारशी चविष्ट लागते, पण होत उलट - आई सर्वाना गरम इडली खाऊ घालते नंतर ती सर्वांचे डबे भरते यादरम्यान परिवारासाठी केलेल्या इडली उरतात व त्या थंड होतात. मग आई अन्न कशाला वातोळ करायचं म्हणून थंडच इडली खाते. तसेच आपण tv मालिका मध्ये पाहतो, जी नट असते ती सर्व परिवाराचे जेवण झाल्यानंतरच जेवण करते. मग यावरून असं दिसून येत कि आपण भौतिक रित्या आधुनिक झालेलो आहोत पण विचाराने आणखी मागास आहोत हे नक्की.
आता वरील उदाहरण देण्याच कारण यासंबंधी थोडी चर्चा करूया. वर म्हटल्या प्रमाणे स्त्री व पुरुषांना कर्करोग झालेली आकडेवारी हि अगदी समान आहे. मग जेव्हा विचार केला कि जास्त प्रमाणात स्त्रिया व्यसन करत नाहीत तरीही त्यांना कर्करोग चे प्रमाण पुरुष बरोबर का ? तेव्हा माझ्या काही निरीक्षणात या पुढील बाबी आलेल्या आहेत. महिलांमध्ये प्रामुख्याने ब्रेस्ट व सेर्विकल कॅन्सर चे प्रमाण जास्त आढळून येते, त्यानंतर लीप,स्टमक,लंग कॅन्सर चे प्रमाण दिसते. मग एवढे व नाना प्रकारचे कॅन्सर महिलांनाच का ? याचे थोडेसे उत्तर तुम्हाला पटतात का बघा,
मुली वयात आल्यानंतर मासिक पाळी चालू होते. हे आपण सर्वांनाच माहित आहे पण त्यास आपण नैसर्गिक न घेता अपवित्र, किंवा अन्य काहीतरी समजतो व इथूनच खऱ्या अर्थाने कर्करोग साठी वाव मिळते. मासिक पाळी दरम्यान फक्त रक्तस्त्राव न होता एस्त्रोजन आणि प्रोजेस्त्रोन सारखे हार्मोन देखील रिलीज होतात. व मोठ्या प्रमाणात प्रोटीन, हिमोग्लोबिन चा ऱ्हास या दरम्यान होतो. यामुळेच हिमोग्लोबिन चे प्रमाण हि पुरुष व स्त्री मध्ये समान नसते. व हि मासिक पाळी ची प्रक्रिया वारंवार होत असल्याने स्त्री चे शरीर व पेशी या कर्करोगास शिकार होतात. यामुळे गर्भाशय चे कर्करोग आपणास भारतात मोठ्या प्रमाणात आढळून येते. यावर उपचार हि आपण करू शकतो पण आपली समाज व्यवस्था मुळे स्त्री सर्व सहन करते व सर्वात जास्त झाले असता तिला उपचार मिळतो पण तेव्हा खूप वेळ होत असतो, त्यामुळे खरच मासिक पाळी वगैरे यास नैसर्गिक आहे म्हणून आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे.
आपल्याकडे मा का दुध पिया है तो मर्द_ म्हणजेच बाळ जन्मल्या नंतर तो आईच्या दुधावर च काहीदिवस वाढतो. व नवजात शिशु चे ३०२ हाडे असतात ते पुन्हा कमी होत जातात. मग या हाडांना अतिशय पोषक बनवण्यासाठी आईचे दूष खूप महत्वाचे असते. आईंच्या दुधामधून मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम शिशु ला मिळत असते ज्यामुळे तो पुढे सशक्त होतो,मात्र आईच्या शरीरातील calcium,protein,etc. कमी होतो तसेच याच्या पूर्वी म्हणजे अर्भक असताना हि तो आई च्या शरीरावरच पूर्णता अवलंबून असतो.
यासर्व मुळे आईचे शरीर कमकुवत होत असते, ज्यामुळे वयाच्या ४० वर्ष पर्यंत येत असताना आईला कर्करोग अथवा अन्य त्रासास सामोरे जाववे लागते. हे असे असताना हि वरील उदाहरण प्रमाणे आई ला योग्य प्रमाणात न्यूट्रीशन मिळत नाही, ज्यामुळे तिच्या शरीराचा फक्त ऱ्हास होत असतो.
वरील परिस्तिथी शहरात थोडीशी बेटर आहे पण ग्रामीण भागात तर खूपच वाईट आहे. ग्रामीण भागात मुलींची मोठ्या प्रमाणात घुसमट होत असते. शौचालय नसल्या कारणाने मुलीना सकाळी अगदी लवकर उठावे लागते, याचसोबत घुसमट च्या भीतीने त्या योग्य प्रमाणात जेवत हि नाहीत याचाच परिणाम न्यूट्रीशन वर होतो व पुढे शरीरातून होणारा ऱ्हास यामुळे तिची पृकृती हि खालावत असते.
हा शारीरिक ऱ्हास भरून काढण्यासाठी न्यूट्रीशन तर लागेलच पण आपल्या समाजाची मान्यता हि हवीय म्हणजे तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांना आपण समजून घेतलं पाहिजे कि ते सर्व नैसर्गिक आहे व यामध्ये लाजिरवाणी वगैरे बाब काहीच नाही पण आपल्या समाजाची घडण असल्यामुळे आज महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
शेवटी एवढच, विचार बदला - जग नक्की बदलेल !!!!!
- प 1 Nilewad
Comments
Post a Comment