मैत्री
आज जीवनात प्रत्येकाला मोठ व्हायचं आहे. प्रत्येकाची काहीतरी स्वप्न आहेत व त्या स्वप्नपूर्ती साठी आपण अथांग मेहनत घेतो व आपण आपल्या यशाच्या शिखरावर जाऊन पोहचतो पण तिथे जेव्हा आपण पोहोचतो तिथे आपले दूर दूर पर्यन्त कोणी नसतात.आपल्या नावाने हाक मारणार ही कोणी सोबत नसत तेव्हा मात्र आपण अतिशय तृप्त असतो स्वताचे नाव ऐकण्यासाठी व त्यावेळी आपला मित्र भेटला आणि आपलया भाषेत हाक मारली न तेव्हा आपले मन खूप आंनंदुण जाते व त्याक्षणी जो आनंद आपणास भेटतो न तो स्वप्न पूर्ती झाल्या नंतर च्या पेक्षा ही अतिशय आनंदाचा असतो.त्यामुळे जीवनात यशाचे शिखर जितके महत्वाचे तितकेच आपल्या साठी मित्र ही महत्वाचे असतात. मैत्री हा शब्द आहे दोन अक्षराचाच पण खूप मोठ्या अर्थाचा.या शब्दात एक जिवा-भावाचे नाते जुळले आहे.हे नाते आपण स्वता सहवासातून बनवत असतो कारण मानव हा समाज शील प्राणी आहे. त्यामुळे जर त्याला जीवन सुंदर पद्धतीने जगायचे असेल तर त्यास कोणी तरी आपल्या जिवा भावाचा व्यक्तिमत्व असलेला जोडीदार हवा असतो.त्यास्तव अगदी लहान पासूनच आपण मित्र बनवत असतो.मित्र बनवत अ...